बाराव्या पुणे लघुपट महोत्सवात बागुलबुवा या लघुपटाने आणि सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार अशी महत्त्वाची पारितोषिके पटकावून छाप पाडली
मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक श्रीकांत कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ छायाचित्रकार राम झोंड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. योगेश बारस्कर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
घुम्या या लघुपटासाठी किशोर वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर याच लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी राहुल लामखडे यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. विकेड या लघुपटासाठी अनामिका डांगरे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला तर प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांना यू मस्ट स्पीक या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. मुक्ती या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक मिळाले.
तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या लघुपट आम मध्ये विविध देशातील 140 लघुपट दाखविण्यात आले त्यापैकी सर्वोत्कृष्ट 36 लघुपटांना पारितोषिके देण्यात आली.
Comments