*न्यूट्रिफाय टुडेने अमेरिकेतील न्यूट्रास्युटिकल कंपन्यांसाठी सुरू केली नवी सेवा
न्यूट्रिफाय टुडे या जगभरात जबाबदार न्यूट्रिशन व्यवसायाला चालना देण्यासाठी व उत्तेजन देण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतातल्या जागतिक कंपनीने योग्य बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी, आर्थिक व ब्रँड मार्केटिंगचे ज्ञान उपलब्ध करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल क्षेत्रातील संशोधकांबरोबर काम करत असताना, प्रगतीची आणि परिवर्तनाची घोडदौड कायम ठेवली आहे. न्यूट्रिफाय टुडे अमेरिकेतील न्यूट्रास्युटिकल कंपन्यांसाठी निरनिराळे नवे व्यवसाय सुरू करत आहे. सुरुवातीच्या नियोजनाच्या व विकासाच्या टप्प्यामध्ये, शैक्षणिक फोरमची मालिका हाती घेतली जाणार आहे.
महामारीमुळे 2020 मध्ये राबवण्यात आलेल्या जागतिक लॉकडाउनमध्ये न्यूट्रिफाय टुडेने (अगोदरचे नाव न्यूट्रिफाय इंडिया) न्यूट्रास्युटिकल नावीन्य राबवणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने, कल्पना ते व्यावसायिकरण सोल्यूशन सुविधेद्वारे 9 दशलक्ष डॉलरहून अधिक मूल्याचे व्यवहार केले आहेत. आशियातील समृद्ध विस्तारामुळे न्यूट्रिफाय टुडेने 8,000 हून अधिक सदस्यांचे व गुंतवणूकदारांचे जाळे निर्माण केले आहे. व्यवसायाच्या नव्या संधींचा लाभ घेऊन, जागतिक न्यूट्रास्युटिकल उद्योगामध्ये सुरळित प्रवेश करण्याचे न्यूट्रिफाय टुडेचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने या क्षेत्रातील विविध घटकांसाठी अधिक जलद व स्पष्ट दिसून येईस अशी न्यूट्रा प्रगती घडून येणार आहे.
चीफ यूएस मार्केटिंग अडव्हॉयजर, तसेच बेकर डिल्लन ग्रुप या न्यूट्रास्युटिकल ब्रँड मार्केटिंग फर्मचे (www.BakerDillon.com) मुख्य कार्यकारी अधिकारी शेल्डन बेकर यांच्यासोबत 17 जून रोजी आयोजित केलेल्या पहिल्या फोरममध्ये सीबीडीच्या (cannabinoid) व हेम्प सप्लाय चेनच्या विविध पैलूंवर भर देण्यात आला, तसेच सीबीडी मार्केटिंगवर परिणाम करू शकतील अशा नियमनात्मक प्रश्नांवरही विचार करण्यात आला.
बेकर यांनी समन्वय साधलेल्या फोरममध्ये ओपन बुक एक्स्ट्रॅक्ट्सचे मुख्य कार्यकारी अदिकारी डेव्ह निउनडोरफर, WANA वेलनेसचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर माइक हेनेसी व फोर्टिस लॉ पार्टनर्सचे भागीदार हेन्री बास्करव्हिले यांचा सहभाग होता.
“शेअर्ड वेल्थ इकॉनॉमी ही संकल्पना न्यूट्रिफाय टुडेचे विचारसरणीला अनुसरून आहे,” असे बेकर यांनी नमूद केले. “भविष्यातील जागतिक आर्थिक वाढ आता विविध सहयोगांच्या शेअर्ड वेल्थनुसार होणार आहे. न्यूट्रास्युटिकल उद्योगामध्ये शेअर्ड वेल्थचा समावेश करत असताना, न्यूट्रिफाय टुडे एकूणच न्यूट्रा उद्योगाच्या फायद्याच्या उद्देशाने न्यूट्रास्युटिकल उद्योगासाठीच्या शैक्षणिक व्यासपिठांची मालिका सादर करणार आहे.”
न्यूट्रिफाय टुडेचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक अमित श्रीवास्तव यांनी सांगितले, “आम्ही योग्य प्रकारच्या पोषणाला जगभर चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि प्रोत्साहन देत आहोत. अमेरिकेमध्ये सेवा देण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही शेल्डन अँड बेकर डिल्लन ग्रुपशी उत्तम नाते निर्माण केले आहे. आमच्या ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे जागतिक स्तरावरील न्यूट्रास्युटिकल दिग्गजांचा वेध घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
www.nutrifytoday.com येथे न्यूट्रिफाय टुडेच्या होमपेजवर सीबीडी फोरम सापडे
Comments