top of page
Writer's pictureTeam Stay Featured

डॉ दीपक जगताप ह्यांच्यासोबत पुन्हा एकदा रंगली विशेष मुलाखत

मुलाखत ही फक्त मुलाखत नव्हती ,तर ते होतं एक परिपूर्ण मार्गदर्शन .


डॉक्टर्स डे च्या निमित्ताने रंगलेल्या ह्या सत्राचे प्रचेतन पोतदार ह्यांनी सूत्रसंचालन केले


डॉ दीपक जगताप ह्यांनीही त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून ह्या सत्रासाठी जवळजवळ ३ तास वेळ दिला



मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे सांभाळावे , औषधे कोणती व कशी घ्यावी , आपल्या नातलगांना कसा आधार द्यावा हे अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितले .


पहिल्या भागात वैभव मालपाणी ह्या तरुणाने खास डॉक्टरांना अर्पण करणारी एक मस्त कविता सादर केली


होमिओपॅथी उपचार व अनेक आजारांबद्दल चे गैरसमज दूर करत पहिल्या भागाची सांगता झाली





दुसऱ्या भागात एक वेगळीच रंगत पाहायला मिळाली


मानसी समुद्रे , चिन्मयी पिसे ह्यांनी गाण्यासोबत चित्रकलेचा अविष्कार सादर केला


त्याला डॉ दीपक जगताप ह्यांची वाहवा मिळाली


पुढे भारतीय वायुदल येथे सक्रीय असणारे कुशल शर्मा ह्यांच्या कविता व गायनाने कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली


तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला संगीतकार उत्कर्ष नेमाडे ह्याचं तबलावादन सुखावणारं होतं


दिशा तासगावकर हिने स्त्री भ्रूण हत्येवर केलेली कविता डॉ जगताप ह्यांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली


प्रेक्षकांना , शिकाऊ डॉक्टरांना अनेक प्रश्नांची उत्तरे खूप खेळीमेळीच्या वातावरणात मिळाली .


ज्यांना ही मुलाखत पाहता आली नाही ते खालील लिंक वर जावून पाहू शकतात


भाग 1



भाग 2


Comments


bottom of page