top of page

झिम्मा मागचे यश...

Writer's picture: Neel DeshpandeNeel Deshpande

मराठी चित्रपट हा सर्वदूर जावा याकरिता खूप प्रयत्न सुरू आहेत , आणि त्यातच एक असा चित्रपट आपल्या सगळ्यांचा भेटीला आला ज्याने जगभरात धुमाकूळ घातला , अख्ख चित्रपटगृह नाचवले , आणि तो म्हणजे झिम्मा ... ज्याचे दिग्दर्शन हेमंत ढोमे , लेखन इरावती कर्णिक आणि चलचित्र कंपनी , एविके एंटरटेनमेंट अशा दिग्गज संस्थांनी निर्मिती केली आहे.


‘झिम्मा’ नुसता मित्रांचा चित्रपट नाही, तर त्या पलीकडचा चित्रपट. लेखन,दिग्द. अभिनय, संगीत सगळ्या पातळ्यांवर ताजातवाना करून टाकणारा सिनेमा! हा प्रवास चित्रपटात नुसता पाहता येणारच नाही तर आपसूक तो तुम्ही स्वत: कराल! ही परदेशवारी, ही नयनरम्य सफर तूम्हाला खूप काही देऊन जाईल.- समीर विद्वंस

झिम्मा मागचे यश खूप मोठं आहे , बॉक्स ऑफिस वर नाही , तर चित्रपटगृहात सुद्धा महिला वर्गाने ग्रुप ने जाऊन हा चित्रपट पाहिला . ह्या मागे , आहे ती महिलांविषयी असलेली स्वातंत्र्याची भूमिका. जगाला महिलचं महत्व पटले असले तरीही , ते अजून कुठेतरी मजबूत नाही , हे लक्षात येत.





झिम्मा ची सगळी स्टारकास्ट ही अगदी 27 वर्ष पासून ते 60 ते 70 ऐंशी च्या सगळ्या 7 बायका , हे इंग्लन्ड ला ट्रिप ला एकत्र येतात , आणि नंतर त्यांनी जो धुमाकूळ घातला ,तो आहे झिम्मा चित्रपट. कथा सादी सोपी आहे. स्पष्ट भाषेत बोले जाणारे संवाद , आणि त्याला विनोदाची झालर. अजून काय हवं ना अशा चित्रपटात …?


झिम्मा च अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भूमिकेला दिलेलं स्वातंत्र्य . जे एकमेकांचे कधीही नाहीत त्यांच्या सोबतीने हा होणारा प्रवास एकदम भारी आणि मनोरंजक आहे . निर्मिती सावंत, सुहास जोशी , सुचित्रा बांदेकर अश्या 40 पेक्षा एधिक वयाचा बायका , तर इकडे सायली संजीव , मृण्मयी गोडबोले, सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग अश्या तरुण मुली अशा अवली बायका घेऊन जाणार , आणि स्वतःचा पहिल्या वूमन स्पेशल ट्रिप चा मुख्य सिद्धार्थ चांदेकर असा सगळा भारी भक्कम ग्रुप जर एक देशात फिरायला गेला , तर धम्माल ,मस्ती , मजा , दंगा , आनंद आणि उत्तम अभिनय तर होणारच ना ...





तर हेच आहे ते गुपित , ह्या कलाकारांचा सगळं गुंता सोडवत ही कथा पुढे नेहण्याचा खेळ म्हणजे झिम्मा , आणि स्वतंत्र साजरं करताना , गावाकडच्या स्त्रियांनी ह्या चित्रपटाचा शो हट्टाने मागून थिएटर मालकांना लावायला सांगितलं .


झिम्मा हा चित्रपट visually masterpiece आहे. एवढा भारी तांत्रिकदृष्ट्या संपन्न असा मराठी सिनेमा कधीतरीच येतो. हेमंत ढोमे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. जमेची बाजू म्हणजे सर्व मुख्य पात्रांचे परफॉर्मन्सेस विशेषतः निर्मिती सावंत यांचे पात्र तुम्हाला पोट धरून हसायला लावेल. - सिनेजगत

अजून एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया


:झिम्मा चित्रपट म्हणजे सरळ, साधा, सोपा प्रवास आहे.. जो प्रेक्षकांना स्वतःसोबत अखंड फिरणं करून आणतो.. साधेपणाने बोललेले डायलॉग..वागणं, बोलणं, चालणं चित्रपटाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक प्रेक्षकाला कुठंतरी रिलेट होतं.. हा चित्रपट पाहणाऱ्याला स्वतःची ओळख देण्यातही हातभार लावतो."


कदाचित पुढे ह्या कल्पनेचा चित्रपट बनेल ही , पण अशी गर्दी आणि हा झिम्मा चा खेळ ह्या चित्रपटबरोबरच साजरा होणार हे नक्की .

त्यामुळे हक्काने , आनंदाने ,उत्साहाने बगा आणि झिम्मा चा खेळ पुन्हा पुन्हा खेळा .....


मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -I'm on Instagram as @bloggerneel. Install the app to follow my photos and videos.



Commenti


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page