"तुमची स्वतःची शैली तयार करा... ती स्वतःसाठी अनन्यसाधारण आणि तरीही इतरांसाठी ओळखण्यायोग्य असू द्या." -ऑर्सन वेल्स
प्रत्येकाला आवश्यक असलेली मुख्य चित्रपट निर्मिती कौशल्ये कशी मिळतील? कुठे मिळतील?
हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो
आपण सगळेच चित्रपट बघतो , आपल्याला त्यातले काही आवडतात तर काही आवडत नाहीत, पण प्रत्येक चित्रपटामागे तेवढीच मेहनत घेतलेली असते . सुरवात होते लिखणापासून. जेव्हा एक लेखक चित्रपटाची निव बांधतो , तेव्हा खर म्हणजे सुरुवात होते ती एका विशिष्ट रचनेला , ज्यातून एक कथा , एक बोध , एक नवीन गोष्ट लोकांसमोर येणार असते .
लेखक आपली बुद्धी , अनुभव , पुस्तक ह्यातून आत्मसात केलेली माहिती एकत्र करून आपली स्वतःची कथा मांडत असतो . मग ती कथा तो स्वतःहून मांडतो एका दिग्दर्शक किव्हा निर्मात्याकडे . ती कथा आवडल्यास त्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला जातो . इथून प्रवास सुरु होतो चित्रपट निर्मिती चा . त्या नंतर कोणत्या ठिकाणी चित्रपट शूट करायचा आहे , हे बघितलं जात आणि त्या नुसार त्या मध्ये कलाकार निवडणे , कॅमेरा साठी असणारा माणूस ,म्हणजेच सिनेमॅटोग्राफर, त्याने ती कथा आपल्या कॅमेरामध्ये टिपून उत्कृष्ट अशी त्याचे चित्रीकरण सादर करून प्रेक्षकांना तो चित्रपट पाहण्यासाठी आव्हान करण्याच काम करून आपली जबाबदारी पार पाडली की त्याचे काम 90% संपते . मग येतात ते कपडे . चित्रपटामध्ये काम करण्याऱ्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्री ह्यांनी कोणते कपडे घालावेत ह्याची शक्यतो नमुद लेखकाने चित्रपट लिहताना केली असते , त्या नुसार कपडे असले की चित्रीकरण करायला सोपं जातं . तसेच कॅमेरा हाताळणाऱ्या व्यक्ती बरोबर इतर काही मदती ला असतात , त्यांना असिस्टंट असे म्हणतात .
तसेच चित्रपटच्या सेट वर एक स्टील फोटोग्राफर सुद्धा असतो, जो चित्रपट शूट होताना चे फोटो काढून आठवणी जमा करत असतो . तसेच बूम , ट्रॉली , ड्रोन ह्या सारखे तंत्रज्ञान वापरून चित्रपट तयार करत असताना प्रत्येकी एक असे व्यक्ती त्या करिता लागतात . चित्रपटाचे चित्रीकरण जवळ पास 50 ते 80 दिवसाचे झाल्यावर , येते ते एडिटिंग ची बारी . एडिटिंग मध्ये जो भाग अपल्या नकोय , तो काढून , किव्हा जो भाग अजून सुंदर करता येईल तो करून चित्रपट 2 ते 2 1/2 तासांमध्ये बसवला जातो . आणि दिग्दर्शक आणि निर्माता मिळून प्रदर्शनाची तारीख ठरवतात.
ह्या पूर्ण कालावधीत जवळ पास चित्रपटासाठी 300 ते 400 लोक काम करत असतात . त्यांचे रोजगार ह्यावरच असतो. त्यामुळे चित्रपट वाईट ठरवताना ह्या लोकांनचा एकदा विचार नक्की करावा, ही नम्र विनंती ..
फिल्ममेकिंगचा अभ्यास केल्याने तुमच्या काही कल्पना प्रत्यक्षात येतील आणि तुम्हाला फिल्ममेकिंगच्या कोणत्या क्षेत्रासाठी सर्वात योग्य आहे याची व्यावहारिक माहिती मिळेल. बहुतेक सर्जनशील अभ्यासक्रम तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यास आणि उपकरणांच्या वापराचा अभ्यास करण्यास अनुमती देतात..
तुम्ही पाऊल ठेवल्यापासून शिकण्याची उत्सुकता आणि निष्ठा दिसून आली पाहिजे. तथापि, तुम्हाला चांगली वृत्ती ठेवण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही करत असलेल्या सर्व कामांमध्ये सशक्त कार्य नैतिकता दर्शविणे आवश्यक आहे. चित्रपटातील करिअर खरोखरच रोमांचक आहे आणि जर तुम्ही त्याचा विचार केला तर - तुम्ही कदाचित आधीच योग्य आहात.
याचा शोध घेऊन, चित्रपट निर्मिती हा तुमच्यासाठी करिअरचा योग्य मार्ग असू शकतो!
लेखक -नील देशपांडे
मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -I'm on Instagram as @bloggerneel. Install the app to follow my photos and videos.
Комментарии