top of page
Writer's pictureAshwin Jangam

गोष्ट महिला क्रिकेट विश्वचषकाची

विराटची 100 वी टेस्ट मॅच तर सुरू झाली. आता उद्यापासून विश्वचषक सुरू होत आहे. असे एकदम दचकून जाऊ नका, आपण गोष्ट करत आहोत आपल्याच देशाच्या क्रिकेट टीम ची. Indian women's cricket team ची आणि महिला क्रिकेट विश्वचषकाची


क्रिकेट हा भारतीयांचा जिवाभावाचा विषय. परंतु आपण जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या क्रिकेट टीम बद्दल ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर फक्त आपल्याला पुरुष क्रिकेट संघ येतो. आपल्याला आपल्याच देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या महिला क्रिकेट संघाची आठवण येत नाही. काही लोकांना तर हे ही माहित नाहीये की आपल्या देशात महिला क्रिकेट टीम सुद्धा आहे. हे असं का होतं असावं?





उत्तर मिळतं , की आपल्या देशातले बरेच क्रिकेट प्रेमी महिला क्रिकेट पाहत नाही . आणि याचं कारण देताना लोकांचं म्हणणं आहे, की महिला संघाला तितकी चांगली कामगिरी करता आली नाहीये जितकी चांगली कामगिरी आजपर्यंत पुरुष क्रिकेट संघाने केली आहे. या गोष्टीत खरंच तथ्य आहे का? चला तर जाणून घेऊया


हे जरी खरं असलं की भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणताही विश्वचषक जिंकला नाही, परंतु 2 वेळा आपला हा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्या पर्यंत पोहोचला आहे, आणि t20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकदा आपला संघ पोहोचला आहे. हे तर फक्त विश्वचषक बद्दल बोलणं झालं, बाकी बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे.


आपल्या पुरुष संघाने विश्वचषक मध्ये 2021 पाकिस्तान ला नेहमी पराजित केलं यात आपण आनंद मानतो. परंतु आपल्या महिला संघाने पाकिस्तान ला आजपर्यंत झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं आहे, मग तो विश्वचषकचा सामना असो, किंवा इतर कोणता. आणि त्याप्रमाणेच बांगलादेश , नेदरलँड्स आणि आयर्लंड च्या संघांना देखील आपल्या महिला संघांनी प्रत्येक एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं आहे.


महिला क्रिकेट मध्ये 6000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या एकमेव फलंदाज मिताली राज आणि सर्वात जास्त बळी घेणाऱ्या झुलन गोस्वामी या आपल्याच देशाच्या खेळाडू आहेत. मिताली राज यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये "सर्वात कमी वयाच्या शतकवीर" (महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट मधले) हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे . परंतु जिथे आपण सचिन तेंडुलकर यांना देव मानतो, तिथे मिताली राज यांचं नाव काही क्रिकेट प्रेमींना देखील माहित नसणं हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे.





एकीकडे आपल्या पुरुष खेळाडूंना इतर देशातल्या Leagues मध्ये खेळता येत नसल्याची खंत आपल्या क्रिकेट फॅन्स ना वाटते. तेव्हा त्यांना हे लक्षात नाही येत की आपल्या महिला टीमच्या स्मृती मंधना, जेमिमह रॉड्रिग्ज , हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रीचा घोष ,पूनम यादव या विदेशातल्या leagues मध्ये चमकदार कामगिरी करून आपल्या देशाची मान अभिमानाने परदेशात उंचावली आहे.


IPL चा विषय निघालाच आहे, तर , नोव्हेंबर मध्ये झालेल्या महिला IPL बद्दल बोलूया .आता झालेल्या महिला IPL मध्ये स्मृती मंधना यांची टीम जेव्हा जिंकली , तेव्हा त्यांनी हळूच जिंकलेला चषक तरुण आणि नवख्या खेळाडूंना दिला, आणि स्वतः त्या एका कोपऱ्यात जाऊन उभ्या राहिल्या. हेच जेव्हा एखादा पुरुष क्रिकेटपटू करतो, तेव्हा " Simplicity level 100" च्या पोस्ट आपल्याला सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळतात. परंतु ते एका महिला खेळाडूने केले तेव्हा अश्या पोस्ट कुठेच दिसल्या नाही.


एकंदरीत काय, तर आपल्या महिला क्रिकेट टीम ने आजपर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. चुकलो आहोत ते आपण, सर्व प्रेक्षक. आणि हीच वेळ आहे आपली चूक सुधारून आपल्या टीम ला सपोर्ट करायची. आजपर्यंत झालं ते झालं, आता यापुढे आपण आपल्याच देशाची शान असलेल्या या आपल्या महिला क्रिकेट टीम ला अगदी तसच सपोर्ट करूया जसं आपण आपल्या पुरूष क्रिकेट टीमला करतो.


थोड्याच वेळात आपल्या वाघिणी पाकिस्तान टीमशी भिडतील आणि आपल्या विश्वचषकाच्या पहिल्या विजयासाठी लढतील. याचसोबत त्या पाकिस्तान सोबतचा विक्रम अबाधित ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील. सोळा वर्षीय शेफाली वर्माची तुफान फटकेबाजी बघा, स्मृती मंधानाच्या सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि सरळ मारलेले लांब षटकार बघा, झुलन गोस्वामी यांच्या तेजतर्रार गोलंदाजी कमाल बघा, पूनम यादव यांच्या फिरकीच्या जादूने घेतलेले विकेट्स बघा, आणि आपल्या देशाच्या क्रिकेट टीमला असच सपोर्ट करत राहा. असाच सपोर्ट राहिला तर भारताच्या या कन्या भारतासाठी पहिला विश्वचषक आणतील यात काहीच शंका नाही


Bleed Blue. And support Women in Blue 💙💙




Authored By:- Ashwin Jangam ( Cricket Analyst, Host and Entertainer)


コメント


bottom of page