top of page

केकाच्या एचआरएमएस योजनेमुळे युरो कार्सची उत्पादकता 22% वाढली

Writer's picture: Team Stay FeaturedTeam Stay Featured

युरो कार्स या मोबिलिटी सोल्यूशन्स प्रोव्हायडरने एचआरएमएस सेगमेंट लीडर केका बरोबर भागीदारी केल्याने त्यांची एचआर प्रक्रिया प्रभावीपणे स्वयंचलित आणि सुव्यवस्थित झाली आहे. एकूण उत्पादकतेत वाढ करण्यात यशाचे द्योतक म्हणून युरो कार्स या निर्णयाकडे पाहत आहे.





युरो कार हा भारताचा मोबिलिटी सोल्यूशन्समधील अग्रगण्य व्यवसाय आहे. केकासोबत हातमिळवणी करण्यापूर्वी, एचआर संबंधीची कामे रोजच्या शिरस्त्याप्रमाणे स्वतःच कंपनी हातळत असत. रजा आणि उपस्थिती नोंदविण्यासाठी श्रेणीबद्ध पत्रावलीचा वापर करण्यात येत होता. या सेवा स्वंयचलित नसल्याने एचआरशी संबंधित अडचणी उद्भवल्या. ज्यात उपस्थिती नोंद हातळण्याच्या सदोष पद्धतीचा समावेश होता. आता स्वंयचलित पद्धतीने या सेवा केका त्यांना मदत करत आहे.


केकाने आपल्या कार्यक्षम दृष्टिकोनामुळे, युरो कार्सच्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण परिणाम मिळवले. यामध्ये सेल्फी अटेंडन्स, जीपीएस ट्रॅकिंग, आणि मोबाइलच्या माध्यमातून उपस्थितीची नोंद यांचा समावेश आहे. ज्यामुळे कर्मचा-यांची उपस्थितीवरील लक्ष ठेवण्याची अचूकता 95 टक्क्यांनी वाढली आहे. युरो कारने आयटी घोषणापत्र तयार करणे आणि कर प्रक्रिया व्यवस्थापनासंबंधीचे 48 तास वाचविले. परिणामी, उत्पादकता 22 टक्क्यांनी वाढली आहे. यातील एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये ठरले कर्जासंबंधीचे. कर्जाची सध्यस्थिती आणि थकलेल्या हफ्त्यांसंबंधीची माहिती मिळणे कर्मचा-यांना सहजसोपे झाल्याने त्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी आपसूकच मदत झाली. युरो कार्सने या एचआर सुधारणांच्या आधारे आपल्या बाह्य सेवा वाढविण्यात यश मिळविले.


"केका हे आमच्या कंपनीसाठी परिवर्तनवादी साधन आहे. ग्राहकांना आनंदाची पर्वणी देणा-या एकूण सर्व सेवा पातळ्यांवर खरे उतरलेले सॉफ्टवेअर ओळखल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. निर्दोष आणि परिपूर्ण सॉफ्टवेअर, ऑनबोर्डिंग प्रक्रियेत सुलभ अथवा विक्रीनंतरही त्यांची तत्पर सेवेचा यात अंतर्भाव आहे. केका दररोज अद्ययावत होत असताना, मला नजीकच्या भविष्यात दुस-या एचआरएमएस सेवा प्रदान करणा-याची गरज वाटत नाही. कारण प्रत्येक कंपनीसाठी केका ही उत्कृष्ट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे," युरो कार्सचे संचालक मोहित मंगल यांनी नमूद केले.


"केकाचे प्राथमिक लक्ष संपूर्ण अत्याधुनिक स्वंयचलित एचआरएमएस आवश्यकता प्रदान करणे आहे. आम्हाला आनंद आहे की युरो कार्सच्या विविध प्रक्रियाआमच्या सेवांद्वारे आधुनिक झाल्या. या संघटनेने केवळ युरो कारच्या अंतर्गत आणि बाह्य वाढीत मोलाची भर घातली नाही, तर आमच्या नावावर आणखी एक यशोगाथा जोडली आहे," असे केकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय यालमानचिली यांनी सांगितले.


केका ऑटोमोटिव्ह एचआर मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये आहे. भारताबाहेरील 3000 हून अधिक व्यवसाय त्यांचे ग्राहक आहेत, ज्यामुळे ते एचआरएमएस क्षेत्रातील भारताची अग्रगण्य संघटना बनले आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार विविध एचआर प्रक्रियांना चालना देण्यासाठी केका बाजारातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करते.

Comments


9561398225

  • Facebook
  • Instagram

©2021 by Stay Featured. Proudly Created by Buzzer Media & Advertising

bottom of page