top of page
Writer's pictureTeam Stay Featured

इशा हुबळीकर सोबत रंगली एक संस्मरणीय मुलाखत

Stay Featured ह्या संकेतस्थळाच्या सहकार्याने , लेखक व माध्यम सल्लागार प्रचेतन पोतदार ह्यांच्या सोबत तरुण मॉडेल इशा हुबळीकर ने नुकताच संवाद साधला .ह्यादरम्यान प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया आणि प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे देखील दिली .


ही मुलाखत अनौपचारिक होत असताना देखील कुठेही विषय भटकत जाणार नाही ही पुरेपूर काळजी इशाने घेतली .


मुलाखती च्या दरम्यान प्रेक्षकांना इशाच्या आयुष्यातील काही कौंटुंबिक क्षणांचे साक्षीदार होता आले


कारण 12 डिसेंबर रोजी तिचा मावशीचा वाढदिवस होता .कधी मामा कडून जुने फोटो दाखवत हक्काने झालेलं कौतुक कार्यक्रमात आपलेपणाचे रंग भरणारे ठरले





12 डिसेंबर 2021 ला प्रेक्षक आणि हितचिंतक वेळात वेळ काढून सायंकाळी 7 वाजायच्या आधीच सज्ज होते

इशा हुबळीकर हिच्या पहिल्यावहिल्या इन्स्टाग्रामवरील अनौपचारिक मुलाखतीची उत्सुकता चोवीस तास आधीपासूनच शिगेला पोचली होती .

अनेक उत्साही प्रेक्षकांनी आपले प्रश्न व प्रतिक्रिया मुलाखत घेणाऱ्या प्रचेतन पोतदार ह्यांच्याकडे आधीपासूनच द्यायला सुरुवात केली .





खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करताना इन्स्टाग्रामवर आलेल्या अनेक प्रश्नांना न्याय देत मुलाखती ची दिशा भरकटू न देता मुलाखकारांनी विचारलेल्या प्रश्नांना इशा नेही आत्मविश्वासाने उत्तरं दिली .


"अनंत आमची ध्येयासक्ती अनंत आमुच्या आशा किनारा तुला पामराला "हे आज अनेकांना इशाकडून शिकायला मिळाले .


वकिलीचे शिक्षण , कंपनी सेक्रेटरी होण्याची निर्धारित केलेली वाटचाल ,ढोल पथकात जोशपूर्ण वादन ,त्या फोटोंमधुन आलेल्या काही संधी ,जोडीला अष्टपैलू म्हणून स्वतःचा खास ठसा उमटवला तरीही पाय सदैव जमिनीवर ठेवणे म्हणजे काय हे सर्व तिने कठोर परिश्रम घेऊन कसे साध्य केले हा प्रवास आज तिने सर्वांसमोर आठवणींच्या माध्यमातून नव्याने उलगडला



एक स्त्री म्हणून समाजमाध्यमे (social media)जवाबदारीने कशी हाताळावीत ,त्यात आपल्या मित्रमैत्रिणी व निकटवर्तीय लोकांचा आयुष्याचा खासगीपणा कसा टिकवावा अशा इतर अनेक प्रश्नांची हातचे राखून न ठेवता मिळालेली उत्तरे प्रेक्षकांना पुढेही खूप मार्गदर्शक ठरतील ह्यात शंकाच नाही .


अंकित खत्री ह्या होतकरू कलाकाराचे तिने कौतुक ही केले , प्रेक्षकांना अनेक प्रश्न विचारायला सांगून एक नवीन आत्मविश्वास दिला .


इन्स्टाग्रामवर व इंटरनेट सेवेचा अनेक वेळा व्यक्तय


आला तरीही ,तिची एकाग्रता न ढळता वेळा तुम्हांला नकारामधून येण्याऱ्या नैराश्यावर कशी मात करावी लागते ह्यावर देखील इशा अनुभवातून किती परिपक्व होत आहे हे सर्वांना दिसले


आपल्या चाहत्यांबद्दल वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करत असताना ,आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसे हाताळावे हे तिने तरुण मॉडेल्सना सांगितले


रॅपिड फायर च्या प्रश्नांना आडपडदा न ठेवता तिने दिलेली उत्तरं ती स्वतःशीच स्पर्धा कशा प्रकारे करते हे अधोरेखित करणारी होती


एकंदरीत ही मुलाखत मार्गदर्शनपर ठरली व igtv च्या माध्यमातून पुढेही ठरेल ह्यात शंकाच नाही


ही मुलाखत वेळ काढून पाहण्यासाठी ,इथे क्लिक करा


भाग १ / ३ :


भाग २ / ३ :


भाग ३ / ३ :

Comments


bottom of page